उरुळीकांचन येथे तरुणाचा खून

उरुळीकांचन- उरुळीरस्त्यावर कदम पाईप सिमेंट कंपनीच्या समोर रविवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी रात्री त्यांचा खून केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव बापू रामा केसकर (वय 40, रा. कोरेगाव मूळ, बोधे वस्ती) आहे. या घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा दत्तात्रय बापू केसकर यांनी दिली आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, कोरेगाव मूळ येथील बोधे काकडे वस्तीवर बापू केसकर यांचे घर आहे. शुक्रवार रात्री ते काही कामांनिमित्त घराबाहेर गेले होते. शनिवारी दिवसभर घरी न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेतला; परंतु त्यांचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह कोरेगाव मूळ व पेठ गावाच्या मध्यभागी दाट झाडीत आढळून आला. बापू केसकर यांचा धारदार शस्त्रांनी गळा कापून खून केला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोरचे महेश ढवाण, उरुळीकांचनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलीस कर्मचारी सचिन पवार, अमोल भोसले, शिरीष कामठे यांनी घटनास्थळी जाउन परिस्थितीची पाहणी केली. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना एका दुचाकी वाहनाची चावी सापडली आहे. या घटनेचा तपास लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळीकांचनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)