उरी व पठाणकोट हल्ल्यासंबंधी संरक्षणमंत्री पाकिस्तानला क्लीन चिट देत आहे का?  

नवी दिल्ली – भाजप सत्तेत आल्यानंतर देशामध्ये एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचा दावा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावरून माजी अर्थमंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर ट्विटरद्वारे टीका केली आहे. २०१६ मध्ये पठाणकोट आणि उरी या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांसाठी त्या (निर्मला सीतारामन) पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत का? असा प्रश्न  चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

पी. चिदंबरम यांनी म्हंटले कि, संरक्षणमंत्री म्हणाल्या कि २०१४ नंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. संरक्षणमंत्र्यांनी नकाशा घेऊन सांगावे कि उरी आणि पठाणकोट कुठे आहे? पाकिस्तानने हे हल्ले केले नसल्याचे सांगून संरक्षणमंत्री उरी आणि पठाणकोट हल्ल्यासंबंधी पाकिस्तानला क्लीन चिट देत आहे का?असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजप अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी दावा केला होता कि, २०१४ नंतर एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. देशामध्ये अशांतता पसरविण्याचा सर्व प्रयत्नांना सीमेवरच संपविण्यात आले आहे. आणि दहशतवाद्यांना शांती भंग करण्याचा कोणतीही संधी न देण्याचे सरकारने निश्चित केले आहे, असे त्यांनी म्हंटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)