उरमोडीच्या पाण्यासाठी लवकरच बैठक -विजयसिंह मोहिते पाटील

अकलूज- पिकअप शेडची संकल्पना माण तालुक्‍यातूनच सुचली असून, उरमोडीच्या पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, माण-खटावच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत माढा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. अकलूज येथे माण खटावमधील मंजूर विकासकामांच्या पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे होते, तर यावेळी माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, हरनाई सहकारी सूत गिरणीचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ, श्रीराम पाटील, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नरळे, बाळासाहेब सावंत, युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्थानिक विकासनिधीतून 2018-19 मध्ये मंजूर केलेल्या विविध गावांतील विकासकामांच्या पत्राचे वाटप करण्यात आले. माण तालुक्‍यांत 16 गावांना ओपन जीम (खुली व्यायामशाळा), 3 ठिकाणी एस. टी. पिकअप शेड, 15 गावांत हायमास्ट दिवे, तर खटाव तालुक्‍यातील 9 गावांना ओपन जीम (खुली व्यायामशाळा), एस. टी. निवारा, 11 गावांत हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आली असून, संबधितांना पत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माण खटावमधील प्रमुख लोकप्रतिनिधींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)