उरमोडीचे पाणी राणंदच्या तलावात सोडण्यात यावे : शिंदे

बिजवडी – राणंद हे उत्तर माणमध्ये येत असून हा भाग वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित आहे. या भागाचा कोणत्याच सिंचन योजनेत समावेश नसल्याने कधी पाणी येईल याची खात्री नाही. राणंद या गावापासून 9 कि. मी.अंतरावर गोंदवले खुर्द हे गाव असून येथील माण नदीच्या बंधाऱ्यात उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे राणंद व परिसरातील गावांना मिळू शकते यासाठी प्रशासनाने टंचाई मधून या गावांना उरमोडीचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माण तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे. राणंद ता. माण व परिसरातील गावे उत्तर माणच्या भागात येतात.तर उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माण तालुक्‍याच्या दक्षिण भागात आले आहे.

मात्र राणंद हे गाव उत्तर माण व दक्षिण माणच्या मध्यावर असून या भागाला उरमोडीचे पाणी जवळ आहे.जिहे कटापूरचे पाणी या भागाला कधी मिळेल हे सांगता येत नसल्याने जवळ आलेले उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडले तर त्याचा फायदा परिसरातील गावांना होणार आहे. राणंद तलावात पाणी सोडण्यासाठी येणारे वीजबील शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून साखर कारखान्यातून भरण्याचे कबूल करण्यात आले आहे. हे पाणी मिळाले तर पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न मिटणार आहे.

प्रशासनाने या मागणीची दखल घेत गोंदवले खूर्द ते राणंद तलावाच्या अंतराचा सर्वे करून टंचाईमधून निधी टाकून बंदिस्त पाईपलाईनद्वारे उरमोडीचे पाणी राणंद तलावात सोडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)