उमेदवारांमुळे पालिकेच्या खजिन्यात पडली भर!

करापोटी 25 लाखांची थकबाकी जमा बड्या थकबाकीदारांची बाकी वसूल
 
श्रीगोंदा – निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याच्यासोबत नगरपालिकेची कुठलीही थकबाकी नाही, असा दाखला जोडणे आवश्‍यक होते. या अटीमुळे उमेदवारांनी मागील सर्व थकबाकी भरल्याने श्रीगोंदा नगरपरिषदेच्या खजिन्यात तब्बल 25 लाख रुपयांची भर पडली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या 19 जागांकरिता 221 जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच सूचक, तर पक्षाचा अर्ज भरण्यासाठी 1 सूचक व 2 अनुमोदक बंधनकारक आहेत. सूचक, अनुमोदक व उमेदवार यांची थकबाकी नील असली, तरच उमेदवारी अर्ज कायम राहत असल्याने या सर्वांना आपली थकबाकी जमा करावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरपट्टी व नळपट्टीच्या थकबाकीपोटी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या खजिन्यात भर पडली आहे. 25 लाख 15 हजार रुपये निवडणुकीदरम्यानच्या काळात जमा झाले आहेत. नोट बंदीच्या निर्णयानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाण ही वसुली झाली आहे. एरवी थकबाकीच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना वणवण फिरावे लागत असे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने का होईना ही वसुली झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)