उमेदवारांना धक्का देत हाकलले बाहेर

नऱ्हे केंद्रावर रेल्वे परीक्षेला बसू न दिल्याचा परीक्षार्थींचा आरोप


सर्व ओळखपत्र जवळ असूनही 200हून अधिक परीक्षार्थी वंचित

-Ads-

पुणे- उमेदवारांकडे मूळ ओखळपत्र असूनही, परीक्षार्थ्यांना रेल्वेच्या परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार गुरुवारी नऱ्हे येथील एका परीक्षा केंद्रात घडला. एवढेच नव्हे, तर कोणतेही कारण नसताना थेट धक्‍के देऊन परीक्षा केंद्रातून बाहेर काढण्यात आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. एकीकडे रेल्वे विभागात मराठी उमेदवारांची संख्या कमी असल्याची ओरड होते. याउलट मराठी मुलांनाच परीक्षेला बसू दिले जात नसल्याचे धक्‍कादायक प्रकाराने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

रेल्वे विभागाकडून देशात सध्या मेगा भरती सुरू आहे. रेल्वेच्या ग्रुप “डी’ पदासाठी तब्बल 64 हजार जागांसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू आहे. यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये बुधवारपासून परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने खासगी कंपन्यांमार्फत घेतल्या जात आहेत. कोणतेही सरकारी ओळखपत्र सोबत बाळगावे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र नऱ्हे येथील आयऑन डिजीटल झोन येथील केंद्रावर मात्र उमेदवारांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

या परीक्षा केंद्रात आधारकार्डसह सर्व ओळखपत्र जवळ असूनही परीक्षेला बसू दिले गेले नाही. परीक्षार्थ्यांनी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशी विविध ओळख दाखवली. मात्र परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी ही ओळख ग्राह्य धरली नाही. या सर्व प्रकारामुळे गेल्या दोन दिवसांत सुमारे 200 पेक्षा अधिक परीक्षार्थी वंचित राहिले आहेत. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देण्यासाठी परीक्षार्थी पोलीस चौकीत गेले असता त्यांची कोणत्या प्रकारची तक्रार ऐकून घेण्यात आली नसल्याचे दीपक भामरे या परीक्षार्थ्याने सांगितले.

रेल्वे व्यवस्थापकांकडून उडवाउडवीची उत्तरे
या पार्श्‍वभूमीवर संतप्त परीक्षार्थ्यांनी रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे धाव घेतली. दरम्यान पुण्यात चार ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. नऱ्हे येथील परीक्षा केंद्र सोडल्यास इतर सर्व परीक्षा केंद्रांवर कोणत्याही एका ओळखपत्रावर किंवा ओळखपत्राच्या प्रती परीक्षेला बसू दिले जात आहे. त्यामुळेच या परीक्षा केंद्रावर कर्मचारी परीक्षा त्यांची अडवणूक करीत त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही, अशा व्यथा त्यांच्यापुढे मांडली. मात्र परीक्षेचे नियोजन आमच्याकडे नसल्याचे सांगत उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याचे परीक्षार्थ्यांने सांगितले.

परीक्षार्थ्यांची परवड…..
नऱ्हे येथील परीक्षा केंद्रात तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा सुरू होती. सकाळी साडेनऊ ते साडेदहा ह्या सकाळच्या सत्रात परीक्षा केंद्रात प्रवेश देताना परीक्षार्थ्यांना मूळ ओळखपत्र असतानाही कलर प्रिंट आऊन आणण्यास सांगितले. त्यामुळे विशेषत: नाशिक, मालेगाव, सटाणा येथून आलेल्या परीक्षार्थ्यांनी लगतच्या झेरॉक्‍स सेंटरवर जाऊन ही प्रिंट काढली. मात्र एका प्रिंटसाठी 50 ते 100 रुपये घेतले जात होते. त्यामुळे एक तर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. त्यात त्यांची आर्थिक लूट केली होत होती. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करीत नाराजी व्यक्‍त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)