उमुक्‍त चंदला वगळले, नेहरा खेळणार तीन सामने

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा
नवी दिल्ली, दि. 16 – मिनी विश्‍वचषक म्हणून प्रसिद्ध असलेली चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेला आशिष नेहरा याला विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्ली संघात सामील करण्यात आले आहे. परंतु नेहराला दिल्लीकडून केवळ तीन सामन्यात खेळविण्यात येणार आहे.
दरम्यान ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली संघातून उन्मुक्‍त चंदला वगळण्यात आले आहे. भारताला अंडर-19 विश्‍वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या उन्मुक्‍तने रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व केले आहे. परंतु मागील तीन हंगामातील त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
युवा खेळाडू ऋषभ पंत दिल्ली संघाचे नेतृत्व करणार असून या संघात शिखर धवन आणि गौतम गंभीर खेळणार आहेत. तर आशिष नेहरा अनेक वर्षांनंतर राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र दुखापतीतून पुनरागमन केल्यामुळे नेहराला केवळ सहा पैकी तीनच सामन्यात खेळविण्यात येणार आहे. ज्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळेल.
दिल्ली संघ
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, गौतम गंभीर, आशिष नेहरा, मिलिंद कुमार, धृव शौर्य, सार्थक राजन, हिम्मत सिंग, नितीश राणा, मनन शर्मा, पवन नेगी, पुलकीत नारंग, प्रदीप संगवान, नवदीप सैनी व विकास टोकास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)