उमाजीराजेंचे कार्य तरुणांनी जाणून घ्यावे

वरवंड- छत्रपती शिवरायांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन उमाजीराजेंनी बहुजन समाजाला एकत्र करून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन चरित्र,इतिहास तरुण वर्गाने समजून घेऊन त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रमुख वक्ते ऍड संभाजी बोरुडे यांनी व्यक्त केले.
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळा नागनाथ युवक मंडळाने पाटस येथील जुना बाजार मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. राजे उमाजी नाईक स्तंभाचे उद्‌घाटन जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विजय चव्हाण, डॉ. मधुकर आव्हाड, अनिल माकर, बाळासाहेब तोंडे-पाटील, सुभाष रंधवे, योगेंद्र शितोळे, काकासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भंडलकर यांनी केले. यावेळी योगेंद्र शितोळे, माणिकआबा भागवत, मिलिंद दोशी, संतोष शितकल, संभाजी देशमुख, ज्येष्ठ नागरिक काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)