उबेर चालकाकडून अभिनेत्रीसोबत गैरवर्तन

बंगाली अभिनेत्रीसोबत एका उबेर चालकाने गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री स्वस्तिका दत्ता हिने पोलीसात उबर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. स्वस्तिका दत्ता हिने चालकाने आपल्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घडल्या प्रकाराबद्दल सांगताना चालकाने प्रवासादरम्यान अर्ध्या रस्त्यातच आपल्याला सोडले असा आरोप स्वस्तिका दत्ताने केला आहे. हे माझ्यासोबत खरंच झालं आहे. मी माझ्या घरापासून ते स्टुडिओपर्यंत उबर कॅब बुक केली होती. पण जमशेद नावाच्या चालकाने ठरलेल्या ठिकाणाहून मला पिक अप केल्यानंतर अर्ध्यातच प्रवास थांबवला आणि मला कारमधून खाली उतरवायला लागलं,अशी माहिती स्वस्तिका दत्ता हिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. स्वस्तिकाने चालकाने फोटो, फोन नंबर आणि नंबर प्लेटचाही फोटो शेअर केला आहे.

पुढे तिने सांगितलं आहे की, जेव्हा मी नकार दिला तेव्हा चालकाने विरुद्ध दिशेला गाडी नेली आणि आपल्या परिसरात नेऊन गैरवर्तवणूक केली. त्याने गाडीतून खाली उतरत दरवाजा उघडला आणि अक्षरश: मला खेचून बाहेर काढलं. जेव्हा मी संतापले आणि मदतीसाठी आरडाओरड करु लागले तेव्हा त्याने इतर मुलांना बोलावण्याची धमकी दिली. मला शुटिंगसाठी उशीर होत असल्या कारणाने आणि युनिट वाट पाहत असल्याने लवकरात लवकर तिथे पोहोचणं गरजेचं होतं. मी माझ्या वडिलांशी बोलून कायदेशीर कारवाईसंबंधी माहिती घेतली, असे स्वस्तिका दत्ताने सांगितले आहेपोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)