उबेर कारवरील दगडफेकीत प्रवासी महिला जखमी

पिंपरी, (प्रतिनिधी) – खासगी प्रवासी सेवा पुरविणाऱ्या ओला आणि उबेर कारचालकांच्या बंदच्या काळात एका उबेर कारचालकाने प्रवासी सेवा सुरु ठेवली. यावरून त्याची कार अडवून कारवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक प्रवासी महिला जखमी झाली. हा प्रकार मंगळवारी (दि. 20) दुपारी पाचच्या सुमारास वाकड येथे घडला.

शिवाजी भोसले (वय 30, रा. लक्ष्मीनगर रावेत, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रविराज प्रकाश डांगे (वय 30, रा. गोंधळे नगर, हडपसर) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी भोसले उबेर गाडीवर चालक म्हणून काम करतात. मनसेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दोन दिवसीय बंद काळात त्याने प्रवासी सेवा सुरु ठेवली होती. मंगळवारी पाचच्या सुमारास भोसले प्रवासी घेऊन जात असताना, वाकड येथील भुजबळ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंडियन ऑइल पंपाशेजारी आला असता आरोपींनी जोरजोरात ओरडून त्याच्या गाडीवर हाताने थाप व बुक्‍क्‍या मारल्या. भोसले याने कार एका बाजूला लावली.

दरम्यान, एका आरोपीने रोडवर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून गाडीवर मारला. त्यामुळे गाडीची काच फुटून आतमध्ये बसलेल्या महिला नीलम संदीप सिंग या जखमी झाल्या. कारचे नुकसान व एका महिलेला जखमी केल्याच्या आरोपावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रविराज डांगे याला वाकड पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)