उबेरच्या विनाचालक मोटर कारच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

न्यूयॉर्क – उबेरच्या विनाचालक चालणाऱ्या ऑटोमॅटिक मोटरगाडीच्या पहिल्या अपघाताची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील ऍरिझोना येथे उबेरच्या विनाचालक ऑटोमॅटिक कारला अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. हा अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हरच्या सीटवर ड्रायव्हर हजर होता, परंतु कार ऑटोमॅटिक पद्धतीने चालली होती, असे पोलीसांनी सांगितले.

ऍरिझोना, पिट्‌सबर्ग, टोरॅंटो आणि अन्य काही मोठ्या शहरांमधून उबेर प्रायोगिक तत्त्वावर विनाचालक ऑटोमॅटिक मोटरकार सेवा देत होती. मात्र अमेरिका आणि कॅनडामधील विनाचालक ऑटोमॅटिक मोटरकार सेवा बंद केल्याचे उबेरने म्हटले आहे. अपघातात मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून या प्रकरणात पोलीसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे उबेरने एका निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)