उबाळेनगर येथे तुटलेला दुभाजक बुजविला

वाघोली- उबाळेनगर येथे पुणे – नगर महामार्गावर चोखीढाणीकडे जाणाऱ्या कॉर्नरला रस्ता दुभाजक तोडल्याने अनेक वाहने रस्ता दुभाजकावरून धोकादायकरित्या क्रॉस करत होती. वाहनांच्या धोकादायक प्रवासाची माहिती संबंधित विभागाला कळविण्यात आली होती. परंतु कोणीच दुभाजक बुजविण्याची काळजी घेत नसल्याने अखेर पोलीस, नगररोड कृती समितीने ग्रामपंचायत जेसीबीच्या मदतीने दगड टाकून दुभाजकावरील वाहतूक बंद केली आहे. तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यात आले असले तरी याठिकाणी पक्‍का दुभाजक होणे गरजेचे आहे, असे माजी उपसरपंच संदीप सातव, समाजसेवक संपत गाडे यांनी सांगितले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)