उबाळेनगर ड्रेनेजलाईन कामाचे भूमिपूजन

वाघोली – येथील उबाळेनगर गल्ली क्रमांक 1 ते गल्ली क्रमांक 31 पर्यंतच्या ड्रेनेजलाईन कामाचे भूमिपूजन सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. त्याचप्रमाणे पंजाबी ढाबा ते पटेल आरएमसी प्लांट रस्त्याचे कॉंक्रीटीकरण कामालाही सुरुवात करण्यात आली. या दोन्ही कामासाठी ग्रामपंचायतीकडून सुमारे 2 कोटी 3 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, माजी उपसरपंच समीर भाडळे, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, महेंद्र भाडळे, पूजा भाडळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या आठ महिन्यामध्ये वॉर्ड क्रमांक एकच्या विकास कामांसाठी सुमारे 3 कोटी 93 लाखांचा निधी स्थानिक सदस्यांनी पाठपुरावा करून मिळविला आहे, असे सदस्य महेंद्र भाडळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)