उबर लाईट ऍप भारतात सादर 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – उबर तर्फे उबर लाईट हे रायडर ऍपचे पुनर्रचित व्हर्जन सादर करण्यात आले. उबरचे उपाध्यक्ष माणिक गुप्ता म्हणाले की भारतात तयार करण्यात आलेल्या या नवीन, कमी जागा घेणाऱ्या ऍपचा उपयोग संपूर्ण जगभरात करता येणार आहे. कमी कनेक्‍टीव्हिटी असलेल्या क्षेत्रात आणि 99 टक्के अँड्रॉईड उपकरणांवर हे ऍप वापरता येणार आहे. एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध असलेले हे ऍप वेगवेगळ्या नेटवर्क स्थिती व डिवाइसेसच्या स्थितीवर अवलंबून न राहता काम करते. आजही जगाच्या लोकसंख्येपैकी खूप कमी जण राईड शेअरिंगचा वापर करतात.

आगामी काळात जगभरातल्या लाखो प्रवाशांपर्यंत पोहोचणे हे जर आमचं उद्दिष्ट असेल तर त्या सर्वांना वापरायला सोपे आणि सहज उपलब्ध होणारे ऍप सादर करणं आमच्यासाठी गरजेचे आहे. भारतात तयार झालेल्या उबर लाईट ऍपमुळे जगभरातले जे प्रवासी जुन्या फोनमुळे किंवा कमी कनेक्‍टीव्हिटीमुळे ऍप वापरू शकत नव्हते त्यांनाही जोडता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)