उबर चालकावर चोरीचा गुन्हा

पिंपरी – मोटारीत विसरलेली पर्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उबेर चालकाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 31 वर्षीय महिलेने यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अक्षय घोले असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने 12 ऑगस्ट रोजी उबेर कारमध्ये देहूरोड ते निगडी असा प्रवास केला.

निगडी येथे उतरल्यानंतर तीन हजारांची रोकड असलेली पर्स आणि मोबाईल कारमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी चालक घोले याच्या मोबाईलवर संपर्क करून पर्स बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच आत्ता वेळ नाही नंतर आणून देतो अशी उत्तरे दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)