उपोषण सोडताच चंद्राबाबू नायडूंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

हैदराबाद : आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जावरून केंद्रातून आपला पाठिंबा काढून घेणाऱ्या तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर एका बालकाच्या हस्ते ज्यूस घेत त्यांनी सायंकाळी आपले उपोषण सोडले. यावेळी त्यांनी पुन्हा भाजप आणि केंद्रसरकारवर टीकास्त्र सोडले.

विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे चंद्राबाबू यांनी उपोषण केले. ते म्हणाले, ‘आपण राज्याच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. अनेक संघटनांनी देखील आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जासाठी आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण, काही राजकीय पक्ष यापासून दूर आहेत. आमचे आंदोलन म्हणजे त्यांना राजकीय अजेंडा वाटत आहे. केंद्र सरकार आंध्रप्रदेशला आपल्या प्रभावाखाली ठेवू पाहत आहे. ज्याप्रमाणे त्यांनी तामिळनाडूमध्ये हस्तक्षेप केले, त्याचप्रमाणे आंध्रात देखील त्यांचे प्रयत्न आहेत. पण, आम्ही तसे होऊ देणार नाही. वायएसआर कॉंग्रेसला सोबत घेऊन केंद्र सरकार डाव रचत आहे. कारण, आम्ही त्यांच्यासमोर झुकणार नाही, हे त्यांना माहिती आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)