उपोषणावर असलेल्या हार्दिक पटेलने लिहीले मृत्यूपत्र

संपत्तीचे केले वाटप


जगण्याची शक्‍यता दुरावल्याचे केले सूचित

अहमदाबाद – पटेल समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर गेले नऊ दिवस उपोषण करीत असलेले या समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांची प्रकृती खालवली आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही लिहीले असून त्यात त्यांनी आपल्याकडील संपत्तीचा वाटा कोणाला द्यायचा हेही निश्‍चीत केले आहे.

आपले आईवडिल, बहीण आणि पाटीदार आंदोलनात शहीद झालेल्या चौदा जणांच्या कुटुंबियांना आपली मालमत्ता वाटून द्यावी असे त्यांनी म्हटले असून यातील एक भाग त्यांनी आपल्या गावातील गोशाळेलाही दिला आहे. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचाहीं अर्ज भरला आहे. पाटीदार अमानत आंदोलन समितीचे प्रवक्ते मनोज परारा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हार्दिक पटेल यांचे बॅंकेत 50 हजार रूपये आहेत. त्यातील 20 हजार रूपये आपल्या आईवडिलांना द्यावेत आणि उर्वरीत रक्कम वर नमूद केल्याप्रमाणे वितरीत करावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची बाकीची जी एकूण संपत्ती आहे त्यातील 15 टक्के आईवडिलांसाठी, 15 टक्के बहिणीसाठी आणि 70 टक्के शहीद झालेल्या पटेल समाजातील कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी वितरीत करण्याची इच्छा मृत्यूपत्रात व्यक्त केली आहे. हार्दिक पटेल हे 25 ऑगस्ट पासून आपल्या फार्म हाऊसवरच उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे भाजप सरकारने अजूनही लक्ष दिलेले नाही. विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटत आहेत.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही त्यांची भेट घेतली तसेच तृणमुल कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली. परारा म्हणाले की त्यांनी अन्नत्याग केला आहेच पण गेल्या 36 तासांपासून त्यांनी आता पाणीही सोडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)