उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

कुलगुरुंच्या निवासस्थानासमोर रात्री विद्यार्थ्यांचा ठिय्या
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासुन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती मंगळवारी सायंकाळी खालावली. उपोषणाला बसलेल्यांपैकी प्रताप हरकळ आणि हनुमंत कुसंगे या विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना ससूनला हलवण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासुन हे विद्यार्थी विद्यापीठ परिसरात उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रशासनातील कुणीही दखल घेत नसल्याने विद्यार्थी संतप झाले आहेत. त्यातच मंगळवारी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली यामुळे इतर संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या निवासस्थानाकडे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धाव घेतली. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या घरासमोर ठिय्या मांडला.

-Ads-

कमवा व शिका योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दुपारी विद्यार्थ्यांची भेट घेतली मात्र, यावर तोडगा न निघाल्याने विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत.
——————-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
2 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)