उपेक्षित घटकांना सक्षम करणे काळाची गरज

सोनजाईनगर : शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करताना मान्यवर.

रूक्‍मिणी घोलप : सोनजाईनगर येथे शिक्षकांच्या सत्कार
वाई, दि. 9 (प्रतिनिधी) – देशात अजून ही गरीब श्रींमतांमधील दरी वाढत असून सक्षमांनी दुर्बलांना मुख्य धारेमध्ये येण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून हातभार लावणे गरजेचे आहे. याची सुरूवात पायाभुत शिक्षणातून होणे गरजेचे आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत तर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. उपेक्षित घटकांना सक्षमक करणे ही काळीची गरज आहे, असे प्रतिपादन संवाद संस्थेच्या प्रतिनिधी रूक्‍मीणी घोलप यांनी सोनजाईनगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांचा भेट वस्तू देवून सत्कार करताना काढले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक सरकाळे यशवंतनगर ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कोळेकर, डॉ. अंनत दौंड, विठ्ठल घोलप, आशा दौंड, मुख्याध्यापिका सौ. जाधव, शिक्षिका सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील शिक्षकांचा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे अशोक सरकाळे, डॉ. अंनत दौंड, यांनी आपले विचार प्रकट केले. मुख्याध्यापिका जाधव यांनी सूत्रसंचालन केले, जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)