उपेंद्र कुशवाह यांनी घेतली तेजस्वी यादवांची भेट

पाटणा – केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (रालोसप) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी शुक्रवारी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए विखुरण्याची शक्‍यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची शुक्रवारीच देशाची राजधानी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी भाजप आणि जेडीयू लोकसभेच्या समान जागा लढवतील, अशी घोषणा केली. रालोसप आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोजप एनडीएमध्येच राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, शहा आणि नितीश यांच्या संयुक्त घोषणेनंतर काही तासांत कुशवाह यांनी तेजस्वी यांची भेट घेतली. त्यामुळे कुशवाह यांचा पक्ष एनडीएमध्ये राहणार का, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कुशवाह आणि नितीश यांच्यात राजकीय सख्य नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नितीश यांचा जेडीयू काही महिन्यांपूर्वी राजद आणि कॉंग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर बिहारमध्ये जेडीयूने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. मागील लोकसभा निवडणुकीत जेडीयू एनडीएमध्ये नव्हता. त्यामुळे रालोसप एनडीएमध्ये सहभागी झाला होता. आता पुढील लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील राजकीय समीकरणे बदलल्याने कुशवाह कुठले पाऊल उचलणार याबाबत औत्सुक्‍य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)