वॉशिंग्टन (अमेरिका) – अगदी उपाशी पोटी मरण पावलेल्या एका भिकारणीच्या बॅंकेच्या खात्यात 9 कोटी रुपये आणि घरात सुमारे अडीच लाख रुपये आढळले आहेत. पैसा हे सर्वस्व आहे आणि पैशाने सारे काही प्राप्त होते असा एक सार्वत्रिक समज आहे. पण तो अनेकदा अत्यंत चुकीचा असल्याची अशी अनेक उदाहरणे दिसून येत असतात.

लेबनॉनमधील फातिमा (52) नावाच्या भिकारणीची गोष्ट अशीच आहे. एक अपंग भिकारीण उपासमारीमुळे मरण पावली होती. मात्र तिची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. फातिमाच्या खात्यामध्ये 9 कोटी रुपये (10 लाख पौंड्‌स) असल्याचे आढळले, तर तिच्या खोलीमध्ये सुमारे अडीच लाख रुपये (दहा लाख पौंड्‌स) जमा असल्याचे दिसून आहे. तिच्या खोलीतील दोन पोत्यांमध्ये 2 लाख 24 हजार रुपये म्हणजे सुमारे अडीच हजार पौंड आढळले आहेत.

लॅबेननची राजधानी बैरुत (लॅबेनॉन) येथे फातिमा नावाच्या भिकारणीचा मृत्यू हृदयविकाराने झाला. पोलीसांनी अल-जहाब या शहरातीतल तिच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन तिचे सारी संपत्ती त्यांच्या ताब्यात दिली, तेव्हा त्यांनाही आश्‍चर्याचा धक्काच बसला.

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले ह्या भिकारणीची भीक मागण्याची पद्धत कोणती होती ? ह्याचा सविस्तर व जाहीर खुलासा केला असता तर आपले राजकारणी वेळोवेळी मदतीसाठी म्हणजेच भीक मागण्यांसाठी परदेशी जातात त्यांना फक्त आश्वासें मिळतात प्रत्यक्ष भीक मिळत नाही वरील माहिती प्रसिद्ध केल्यास त्यांच्या भीक मागण्यांच्या पद्धतीत सुधारणा करणे सोईचे ठरेल असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)