उपायुक्त कुलकर्णी यांचे निलंबन मागे

हजर न झाल्याने शासनाने केली होती करवाई

पुणे – पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त सतीश कुलकर्णी यांचे राज्य राज्यशासनाने केलेले निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. त्यांनी तातडीने बदली झालेल्या पदी हजर व्हावे, या अटीवर त्यांचे निलंबन मागे घेतल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

कुलकर्णी हे महापालिकेतील महत्वाच्या प्रकल्पांचे भूसंपादन अखेरच्या टप्प्यात असल्याने बदलीच्या ठिकाणी हजर होऊ शकले नसल्याने त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यसभेत केली होती. तसेच राज्यशासनाकडे त्याबाबतचे पत्र पाठविण्याचा निर्णयही घेतला होता. मागील महिन्यात 12 फेब्रुवारीला उपायुक्त पदावरून कार्यमुक्त करून शासनाने सतीश कुलकर्णी यांची बदली उपसंचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई या पदावर केली होती. त्यानंतरही कुलकर्णी तब्बल महिनाभरापासून महापालिकेतच कार्यरत होते. तसेच आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले नसल्याचे सांगत ते पालिकेतच कार्यरत होते. त्यामुळे शासनाने कुलकर्णी यांना पुन्हा 12 मार्च 2018 ला आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतरही कुलकर्णी बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने त्यांचे 13 मार्च रोजी निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, कुलकर्णी यांच्या बदलीच्या पहिल्या आदेशानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्यशासनास पत्र पाठवून त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर निर्णय होण्याआधीच शासनाकडून कुलकर्णी यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता.

त्यामुळे शासनाने पुन्हा 12 मार्च रोजी आयुक्तांना पत्र पाठवून त्याच दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत हजर राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही कुलकर्णी हजर झाले नाहीत. शासनाच्या पत्रात “12 मार्चला हजर न झाल्यास गैरहजरी ही अनुपस्थिती समजून कालावधी सेवाखंड समजण्यात येईल तसेच शासन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शिस्तभंग’ अशी कारवाई करण्याचा इशाराही पत्रात देण्यात आला होता. त्यानंतरही ते रुजू न झाल्याने त्यांना शासनाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अखेर बदलीच्या ठिकाणी कामावर तातडीने हजर होण्याच्या अटीवर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून कुलकर्णी यांनी उपसंचालक, नगर परिषद प्रशासन हा पदभार स्वीकारल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)