उपाध्यक्षांच्या अधिकारात वाढ करा

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकप्रतिनिधींची मागणी : रखडलेल्या प्रकल्पांना येणार गती

पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रत्येक कामासाठी लष्करी मुख्यालयाकडे घ्यावी लागणारी धाव आणि बोर्डाच्या उपाध्यक्षांना असलेले मर्यादित अधिकार यामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत. परिणामी अनेक प्रकल्प रखडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ लष्कराच्या परवानगीवर अवलंबून न राहाता, बोर्डाच्या उपाध्यक्षांचे अधिकार वाढविले जावेत. तसेच किमान दहा कोटीपर्यंतचे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बोर्डाला देण्यात यावा, अशी मागणी बोर्डाच्या लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.

-Ads-

लष्कराच्या ताब्यातील नागरी क्षेत्राच्या सोयी-सुविधांबाबत काम करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली. यामध्ये लोकप्रितिनिधी आणि लष्कराचे अधिकारी यांचा समावेश असतो. मेजर जनरल श्रेणीचे लष्करी अधिकारी हे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष असतात, तर लोकप्रतिनिधींपैकी एक प्रतिनिधी हा बोर्डाचा उपाध्यक्ष असतो. बोर्डाच्या नियमानुसार, कॅन्टोन्मेंट भागातील सर्व विकासकामांसाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्‍यक असते. मात्र, दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या क्षेत्रांमुळे तेथील कामाचा विस्तार बराच असतो. त्यातच प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रकल्पांचा निर्णय घेण्याचा अधिकार लष्कराच्या मुख्यालयाकडे असल्याने या प्रक्रियेत बराच वेळ लागतो. अनेकदा तातडीचे निर्णय घेण्याची गरज असताना, नेमके काय करावे? असा प्रश्‍न बोर्डापुढे निर्माण होतो. अशावेळी बोर्डाच्या उपाध्यक्षांचे अधिकार वाढविल्यास या प्रश्‍नावर तोडगा निघण्यास मोठी मदत होईल.

लष्करी अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधी हे येथील नागरी क्षेत्रात जास्तकाळ वास्तव्य करत असतात. त्यामुळे स्थानिकांच्या समस्यांची त्यांना जाण असते. अशावेळी उपाध्यक्षांना ज्यादाचे अधिकार मिळाल्यास अनेक समस्या मार्गी लागू शकतील, असे उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनाही मिळावा विकासनिधी
ज्याप्रमाणे महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील विकासकामांसाठी विशेष निधी मिळतो, त्याप्रमाणे बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या क्षेत्रातील विकासकामांसाठी विशेष निधी मिळावा, अशी मागणी श्रीगिरी यांनी केली आहे. यामुळे बोर्डाच्या विकासात मोलाची भर पडेल असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)