उपाध्यक्षपदी विकी बनकर यांची नियुक्‍ती

चिंबळी- महाराष्ट्र केसरी पै. विकी हिरामण बनकर यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी नियुक्‍ती झाली आहे. त्यांना नियुक्‍ती पत्र कामगार व कौशल्य राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात धुमाळ, प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष काबंळे, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रसाद कोंडे, माथाडी महामंडळ सल्लागार अनुप मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. विकी बनकर यांच्य निवडीचे खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, मोशी, केळगाव, डुडूळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, भोसरी, चाकण परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)