उपहारगृहाचालकाला खंडणीसाठी धमकावणारा जेरबंद

पुणे,दि.29-
रविवार पेठ भागातील एका उपहारागृह चालकाला खंडणीसाठी धमकावून मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी पकडले. त्याने उपहारचालकास शिवीगाळ करुन दर महिणा 25 हजाराची खंडी मागितली होती. तसेच जाताना उपहारगृहाची तोडफोड करुन तीन हजाराचे नुकसान केले.
जुनैद अफजल खान (28 , रा.रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 28 वर्षीय उपहारगृह चालकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका उपहारगृहचालकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे रविवार पेठ भागातील सतरंजीवाला चौकात उपहारगृह आहे. खानने उपहारगृह चालकाला धमकावले. दरमहा पंचवीस हजार रूपये हप्ता देण्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन उपहारगृहचालकाला मारहाण केली. उपहारगृहातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून खानने गल्लयातील तीन हजारांची रोकड लुटली. घाबरलेल्या उपहारगृह चालकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पसार झालेल्या खानला पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. चौधरी तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)