उपशिक्षण अधिकाऱ्याची खुटबाव विद्यालयाला भेट

केडगाव – जिल्हा परिषदेच्या उपशिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी मंगळवारी (दि. 4) खुटबाव (ता. दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाला भेट देऊन शालेय कामकाजांची माहिती घेतली.
उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना गायकवाड यांनी सांगितले की, शिक्षकांनी बदलत्या अभ्यासक्रमानुसार अध्यापन करणे गरजेचे आहे. अध्यापन करताना मुले घडली पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवल्यास निश्‍चितपणे आधुनिक पिढी घडण्यात शिक्षकांचा हातभार लागेल. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य हिंदूराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गायकवाड यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका म्हणून निवड झालेल्या विद्यालयाच्या उपशिक्षिका उज्वला कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक बाबासाहेब सरतापे समवेत सर्व शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)