उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे

वडूज – दहिवडी उपविभागीय पोलीस हद्दीतील माण व खटाव तालुक्‍यातील सर्व अवैध धंदे त्यामध्ये मटका, जुगार, दारू,वाळू माफिया आदी अवैध धंदे करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर राहणार असून कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार निर्माण करण्यात आलेल्या “निर्भया पथकास” अधिकाधिक सक्षम बनविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी वडूजचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सध्या मुली व महिलांवरील होणारे वाढते अत्याचार, रोडरोमियो,पाकिटमार, चोर, यांच्यामुळे सामान्य जनतेला होणारा त्रास, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “निर्भया’पथकाला जनतेचा प्रतिसाद मिळत असून हे पथक अधिक सक्षम करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व कॉन्स्टेबल निलिमा रासकर यांनी आपल्या कर्तृत्ववाने विश्‍वासू अशी प्रतिमा निर्माण केली आहे. दहिवडी व म्हसवड तसेच औंध,गोंदवले आदी धार्मिक ठिकाणी, एस टी स्टॅंड,शाळा, कॉलेज व गर्दीच्या ठिकाणी हे पथक सक्रिय राहणार आहे. संकटसमयी नागरिकांनी 100 व 1091 या टोल फ्री क्रमांकावर तसेच मोबाईल वरही संपर्क करण्याचे आवाहन या पथकाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम कडक करण्यात येणार असून दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर हद्दपारीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. शहरातील वाहनांची गर्दी,त्यामुळे होणारे अपघात यावर ही संबंधित नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पार्किंग व सीसी टीव्ही लावण्यात येणार असल्याचे ही वडनेरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)