उपवास रुचकर करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बाजारात दाखल

indian fasting food recipes, mahashivratri food, navratri food, vrat food

पिंपरी – बुधवारपासून शक्‍तीस्वरुपिनी देवी दुर्गेच्या आराधनेचे पर्व म्हणजेच नवरात्रीस प्रारंभ होत आहे. देवी दुर्गेचे भक्‍त नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्‍ति-भावाने देवीची उपासना व उपवास करतात. भक्‍तांना या उपवासात देखील रुचकर फराळ मिळावा, यासाठी बाजारात कित्येक प्रकारचे वेगवेगळे तयार पदार्थ, कच्चे पदार्थ आणि त्यांच्या रेसिपी दाखल झाल्या आहेत.

एकेकाळी उपवास म्हणजे केवळ साबुदाना खिचडी, भगर, फळे आणि जास्तीत जास्त साबुदाना वडे एवढाच काय तो उपवासाचा मेन्यू असायचा. परंतु सध्या नऊ दिवस भाविकांना वेगवेगळे रुचकर पदार्थ खायला मिळावेत यासाठी खाद्य प्रक्रिया उद्योगाने कित्येक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

यात सर्व प्रकारची आवड असणाऱ्यांचा प्रामुख्याने विचार केला आहे. गोड आणि तिखट आवडणाऱ्या दोन्ही प्रकारच्या भाविकांसाठी हे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. तिखट आवडणाऱ्यांसाठी भेळ, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा बाजारात उपलब्ध आहे. तर उपवासाची पीठे देखील कित्येक प्रकारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या पिठांपासून उपवासात खाता यावे, अशा भाकरी, इडली, ढोकळा, डोसा तयार करता येतात. याची रेसिपी देखील उत्पादकांनी या पिठांसोबत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच बटाट्याचे शेव आणि उपवासाची मिसळ करता यावी, असे पदार्थ देखील बाजारात उपलब्ध आहे.

वेफर्समध्ये देखील बाजारात कित्येक प्रकार उपलब्ध होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स बाजारात मिळत आहेत. तसेच शिंगाड्याचेही अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. यातून खीर, उपमा आणि तळून कुरडई देखील तयार करता येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)