उपराष्ट्रपती गुरुवारी पिंपरीत

पिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येत्या गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेचार वाजता तुकारामनगर, पिंपरी येथील विद्यापीठाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यकमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. डॉ. प्रतापसिंह जाधव व ऍड. विष्णू पारनेरकर यांना डॉक्‍टर ऑफ लेटर्स आणि केआयएसएसचे संस्थापक प्रा. अच्युत समंथा यांना डॉक्‍टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली जाणार आहे.

या समारंभात 1056 स्नातकांना पदवी किंवा पदविका, 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि 12 विद्यार्थ्यांना पीएच. डी प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ. पी. एन. राझदान विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)