उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या

हिंजवडी – मारूंजीत एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.

संग्रामसिंग भगतसिंग राजपूत (वय-55, रा. मारूंजी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामसिंग गेल्या काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहतात. शुक्रवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे शेजाऱ्यांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औंध रूग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)