उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील व्हॅन उलटून नऊ पोलिस जखमी 

तंजाऊर – तामिळनाडुच्या उपमुख्यमंत्र्याच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी निघालेली पोलिसांची एक व्हॅन उलटून झालेल्या अपघातात नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा प्रकार आज तंजाऊर जिल्ह्यातील ओराथनादू येथे घडला. हे सर्व जण तंजाऊर येथून अलडीक्कीमोलाई कडे चालले होते. तेथे ही व्हॅन उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात तैनात करण्यात येणार होती.

उपमुख्यमंत्री पलानीस्वामी सध्या राज्याच्या वादगळग्रस्त भागाला भेट देत आहेत. सर्व जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना ओराथनादू येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील बहुतेकांची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या राज्याला गज चक्रीवादळाने गेल्या आठवड्यात झोडपले आहे. त्या भागातील मदत कार्यावर देखरेख ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्र्यांकडे आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)