उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतची हिंदकेसरी परवेशवर मात

समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्यातर्फे आयोजन


महाराष्ट्र, दिल्ली व हरियाणातील मल्लांमध्ये रंगल्या कुस्त्या

पुणे – अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या निकाली कुस्तीत हरियाणाचा हिंदकेसरी परवेश मान याचे आव्हान मोडून काढताना उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याने चांदीची गदा जिंकली. प्रथम क्रमांकासाठी झालेली ही कुस्ती तब्बल अर्धा तास रंगली.

उत्कंठा पणाला लागलेल्या या लढतीत दोघेही मल्ल ताकदीने लढले. परंतु किरण भगतच्या कौशल्यासमोर परवेश मान अखेर अपयशी ठरला आणि किरणने चांदीची गदा पटकाविली.

समस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त शिवशंभो स्टेडियमवर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला 100 वर्षापेक्षा मोठी परंपरा असून पश्‍चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 4 लाख रुपये तसेच स्पर्धेतील अन्य गटांमधील विजेत्या मल्लांना एकूण 26 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुज्जर ही लढत एकतर्फीच झाली. या लढतीत गुज्जरने माऊलीला जिंकण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच त्याने माऊलीला चितपट केले. तसेच आणखी एका बहुप्रतीक्षित लढतीत दिल्लीच्या हितेश कुमारने कोल्हापूरच्या बालारफीक शेखला पराभूत करीत अनपेक्षित निकालाची नोंद केली. विजेत्या पैलवानाला चांदीची गदा देण्यात आली.

यानिमित्ताने देशातील नामवंत पैलवानांचे मल्लयुद्ध अनुभवण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळाली. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण 66 कुस्त्या महाराष्ट्र विजेत्या, अखिल भारतीय विद्यापीठ विजेत्या, तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांमध्ये वादळ निर्माण करणाऱ्या पैलवानांच्या झाल्या.

महत्त्वाचे निकाल –
किरण भगत (सोलापूर) विजयी विरुद्ध परवेश मान (हरियाणा), अजय गुज्जर (हरियाणा) विजयी विरुद्ध माऊली जमदाडे (कोल्हापूर), हितेश कुमार (दिल्ली) विजयी विरुद्ध बालारफीक शेख (कोल्हापूर), कौतुक डाफळे (पुणे) विजयी विरुद्ध प्रवीण भोला (दिल्ली), उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर विजयी विरुद्ध विकास जाधव, सागर बिराजदार (पुणे) विजयी विरुद्ध योगेश बोंबाळे (कोल्हापूर), अक्षय शिंदे (पुणे) विजयी विरुद्ध विजय गुटाळ (कोल्हापूर), विलास डोईफोडे (पुणे) विजयी विरुद्ध ज्ञानेश्वर गोचडे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)