उपप्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र

पिंपरी – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आपल्या कामासंदर्भात येणाऱ्या नागरिकांना किरकोळ माहिती मिळत नसल्याने अनेकदा नागरिकांची धावपळ होते. शिवाय थोड्याशा कामासाठी कार्यालयात हेलपाट मारावे लागतात ही बाब लक्षात घेवून नागरिकांची धावपळ थांबवण्यासाठी आता पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मदत केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाचा कारभार आता पारदर्शक आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सहाय्यक अधिकारी सुबोध मेडसिकर यांच्या पुढाकाराने सोमवार (दि.24) पासून सुरु करण्यात आले आहे. वाहन परवाना, वाहन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, खटला संदर्भातील केसेस, वाहन हस्तांतर आदी कामे कुठे होतील याबाबत माहिती नागरिकांना नसते. नागरिकांना संपूर्ण कार्यालयात धावपळ होते. त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ व श्रम वाया जातात. यामुळे अनेकवेळा नागरिकांच्या मनात “आरटीओ’च्या कार्यालया संबंधित नकारात्मक भावना निर्माण होती. मात्र, त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नागरिकांसाठी आता “हेल्प डेक्‍स’ सुरु करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आरटीओ’ कार्यालयात दुर वरुन कामासाठी आलेल्या नागरिकांना कागदांची पूर्तता अथवा कायदेशीर बाबीची नेमकी माहिती नसल्याने त्यांना सतत हेलपाटे मारावे लागतात. तर कार्यालयातील विभागांची माहिती लवकर मिळत नाही. मात्र, आता याचा फायदा नागरिकांना होणार आहे. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि इतर कामामुळे “आरटीओ’ कार्यालयात कामाचा ताण वाढला आहे. यामुळे कमी मनुष्यबळात कामे पूर्ण करावी लागतात. मात्र, आता “हेल्प डेक्‍स’साठी आता स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे. यामुळे आता आरटीओ कार्यालयाच्या कामातही गती येणास मदत मिळणार आहे.

नागरिकांचा वेळ आणि धावपळ वाचावी व कामात अचूकता यावी म्हणून मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. एकच दिवस ग्राहक दिन पाळण्यापेक्षा नागरिकांना कायमस्वरुपी मदत मिळणे गरजेचे आहे. अचूक माहिती मिळाल्यास नागरिकांची कामे लवकर होतील. व कार्यालयाच्या कामातही सूसुत्रता येण्यास मदत होईल.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)