उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना पोतराजच्या वेषात निवेदन

अकलूज- अकलूज परिसरातील प्रवासी वाहतुक करणाऱ्या पॅगो रिक्षा आणि चारचाकी टप्पा परमिट (काळी पिवळी जीप), तसेच टुरिस्ट वाहतुकीसाठी नव्याने परमिट वितरीत करण्याची जनसेवा रिक्षा संघटनेची मागणी उपप्रादेशिक अधिकारी, अकलूज यांना पोतराजच्या वेशात निवेदनाद्वारे केली आहे.
अकलुज शहरातील पॅगो रिक्षा (डीझेल 3 + 1) ग्रामीण, तसेच जिपसाठी टप्पा (काळ-पिवळी) प्रवासी वाहतुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परमिट वितरीत करण्याची मागणी जनसेवा रिक्षा संघटनेने केली असून, त्या मागणीचे निवेदन पोतराजाच्या वेशात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या वतीने सहाय्यक परीवहन अधिकारी नितिन घोडके यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन देताना अकलुज परीसरातील जनसेवा रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते आणि अकलुज शहर अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड युवासेना शहर प्रमुख शेखर खिलारे, राजाभाऊ जाधव, साईनाथ लोखंडे, सागर भुजबळ, हनुमंत भुजबळ, प्रमोद पोळके, विजय गायकवाड, शंकर कांबळे, विकास खंडागळे, लहु पाटोळे, सुरज साठे, दलित महासंघ विभागीय अध्यक्ष बच्चन साठे, जिल्हा सरचिटणीस धनाजी साठे आणि रिक्षा चालक मालक उपस्थित होते. या प्रकरणी मागणी मान्य न केल्यास जनसेवा रिक्षा संघटनांच्या वतीने 26 मार्च 2018 रोजी परिवहन कार्यालय शंकरनगर येथे डॉ. धवलसिंह मोहीते पाटील, जनसेवा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते यांच्या उपस्थितीत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अकलुज शहर जनसेवा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी निवेदनात दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)