उपनिरीक्षक पालवे यांना विशेष सेवा पदक

सविंदणे-शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक भगवान जगन्नाथ पालवे यांना 14 ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2017 पर्यंत गडचिरोलीमध्ये खडतर सेवा केल्याबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. राज्य सरकारने पदकाची नुकतीच घोषणा केली आहे. पदक जाहीर झाल्यामुळे टाकळी हाजी बेट परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भगवान पालवे यांनी टाकळी हाजी औटपोस्टची सुत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूधंद्यांवर, वाळूमाफीयांवर धडक कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)