उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

वाठार स्टेशन : पोलिस उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा सत्कार करताना सपोनि मारुती खेडकर, व्यासपिठावर डीवायएसपी प्रेरणा कट्टे. (जलाल खान पठाण)

वाठार स्टेशन, दि. 1 (वार्ताहर) – वाठार पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर यांचा नुकताच सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांनी सत्कार केला.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक विभुते, वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर, माजी उपसरपंच नागेश जाधव, वाठार पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि चिंचकर यांचे कुटुंबिय उपस्थित होते. अनंत चिंचकर यांनी वाठार पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची उणीव भासणार आहे, असे मत व्यक्त करत त्यांना पुढील आरोग्यदाशी दीर्घायुष्यासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, उपाध्यक्ष हाफिज पटेल, सचिन जाधव, सोसायटीचे संचालक भगवानराव घोंगडे, मंगेश शितोळे व वाठार पोलिस स्टेशन परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)