उपचार टाळणे भोवले, धर्मादाय आयुक्तांची नोटीस

पुणे – मोफत उपचाराच्या योजनेस पात्र असूनही रुग्णाला उपचार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एन. एम. वाडिया कार्डिओलॉजी रुग्णालयाला धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागाच्या कार्यालयात एका हृदयरोग त्रस्त रुग्णाने मोफत उपचारासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत शिधापत्रिका आणि उत्पन्नाचा दाखल देण्यात आला होता. त्या अर्जासह कागदपत्रांची छाननी करून धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त नवनाथ जगताप यांनी एन. एम. वाडिया कार्डिओलॉजी रुग्णालयास संबंधित रुग्णास हायकोर्टाच्या योजनेंतर्गत उपचार देण्यासंदर्भात शिफारशीचे पत्र देण्याची शिफारस केली. त्यानुसार संबंधित रुग्णाचे नातेवाईक शिफारसपत्र घेऊन रुग्णालयाच्या प्रशासनाकडे गेले. मात्र, प्रशासकाडून या पत्राचा उपचारासाठी काहीही फायदा होणार नाही, असे सांगत महापालिकेच्या शहरी गरीब योजनेंतर्गत समाविष्ट असल्याचे पत्र आणण्याची सूचना संबंधित कर्मचाऱ्याने केली. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाने धर्मादाय आयुक्तालयाशी संपर्क साधला असताना, संबंधित रुग्णाला उपचार करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

“हायकोर्टाच्या मंजूर योजनेतील तरतुदीनुसार उपचारास पात्र असल्याने या रुग्णावर उपचार करण्याचे पत्र दिले. धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशानंतरही टाळाटाळ केली जात आहे. त्यासंदर्भात आपले म्हणणे मागविण्याचे आदेश दिले आहेत. या बाबत लेखी म्हणणे सादर करावे, असे संबंधित रुग्णालयास दिलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)