उपचारासाठी आता पुण्य-मुंबईची गरज नाही

खा. शरद पवार : साताऱ्यात यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसचे उद्‌घाटन

सातारा – यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात सर्व सोयींनीयुक्त हॉस्पिटल सुरु होत असल्याने पुणे, मुंबईला फारसे जाण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. डॉ. अनिल पाटील यांनी अपार कष्टातून हे हॉस्पिटल उभे केले आहे. डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्‍टर आहात तर मीही पेशंटमधला मल्टीस्पेशालिस्ट पेशंट आहे, अशी टिपणी खा. शरद पवार यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, डॉ. अनिल पाटील, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. प्रिती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. शरद पवार म्हणाले, या हॉस्पिटमध्ये ऍडमिट होण्याचा प्रसंग कुणावर येऊ नये. एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं म्हणून मी त्यांना विचारलं तुमची बॅंक कुठली? बॅंकेचं काय घेतल तुम्ही? कारण मोठी हॉस्पिटल उभी केली जातात ती बॅंकेची मदत घेवून. त्यानंतर बॅंकेचा हप्ता देण्यासाठी डॉक्‍टरांचं लक्ष रुग्णांवर असतं. मात्र, डॉ. पाटील यांनी बॅंकेची मदत घेतलेली नाही. आयुष्यभर कष्ट केले आणि त्यातून जी साठवणूक केली त्यातून हे हॉस्पिटल उभं केलं. बॅंकेचा बोजा नसल्यामुळे रुग्णांवर त्याचा भार पडणार नाही, असा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. सातारामधील लोकांना उपचारासाठी आता पुणे, मुंबईला जायची फारशी आवश्‍यकता पडणार नाही.

हॉस्पिटलच्या उद्‌घाटनाला गेल्यानंतर अनेकवेळा अनेक गोष्टींची आठवण होते. डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट आहात, तुम्ही मल्टिपर्पज हॉस्पिटल याठिकाणी काढलंय, मल्टिपर्पज हॉस्पिटलच्या व्याख्येत बसणारा पेशंटही महत्वाचा असतो आणि तो पेशंट मी आहे. त्यामुळे डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट आहात तर मीही स्पेशालिस्ट पेशंट असल्याची मार्मिक टिप्पणी खा. पवार यांनी केली.

खा. उदयनराजे म्हणाले, डॉ. अनिल पाटील यांच्यात सोशल आउटलूक आहे. देशाच्या सीमेवर जवान मृत्यूमुखी पडतात, त्यापेक्षा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. पाटील यांनी सुरू केलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातरकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, न्यूरो सर्जरीत डॉ. पाटील यांचे नाव घेतले जाते. ते सर्जन असले तरी संवेदनशील व हळवे आहेत. त्यांनी गरीब रुग्णांवर मोफत उपचार करून सेवाभाव जपला आहे. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिल पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील रुग्णांना परवडेल, अशी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न मी करत आहे. यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा माफक दरात देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी केले. डॉ. अनिल कारापूरकर, डॉ. व्ही. एन. श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचलन स्नेहल दामले यांनी
केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)