उन्हाळ्यात रसवंतीगृहाच्या घुंगरांचा आवाज वाढला

गराडे- कडक उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे… उन्हाच्या झळा मोठा प्रमाणात जाणवू लागल्या आहेत… अशा तापलेल्या वातावरणात क्षणभराच्या विश्रांतीसाठी प्रत्येकजण सावली शोधत असतो… अशा परिस्थितीत सावलीसोबत थंडगार आरोग्यदायी उसाचा रस मिळाला तर, आनंदच… उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये असा आनंददायी अनुभव एकाच ठिकाणी अनुभवायला मिळू शकतो… तो म्हणजे रंसवतीगृहात.
राज्यात रसवंतीगृह व्यवसायासाठी पुणे जिल्ह्यातील “पुरंदर तालुका’ प्रसिद्ध आहे. हा तालुका हा दुष्काळी असल्याने पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शेती आठमाही आहे. त्यामुळे इथला शेतकरी पावसाळा व हिवाळा ऋतूंमध्ये शेती आणि उन्हाळ्यात शेतीपूरक व्यवसाय करण्यावर भर देतो. अशा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे रसवंतीगृह. पूर्वी या तालुक्‍यातील शेतकरी विविध जिल्ह्यात जाऊन ही व्यवसाय करायचा. मात्र सध्या विविध जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागा भाडे, वाढती मजूरी, उसाचा वाढलेला भाव यामुळे हा व्यवसाय परवडत नाही.
यावर उपाय म्हणून पुरंदर मधील रसवंतीगृह व्यवसायिकांनी आपल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेत जमिनिच्या जागेवर तसेच काहींनी भाड्याने जागा घेऊन रसवंतीगृह सुरू केलेली आहेत. कारण पुरंदर तालुका हा पुण्यापासूनजवळ असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने, सासवड कोंढवा रस्ता, पुणे-बारामती महामार्ग, कापुरहोळ-सासवड रस्त्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. काही रसवंतीगृहवाले आधुनिक यंत्रांद्वारे रसवंतीगृहाचा व्यवसाय करतात. तर, काही ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बैलाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धत्तीने काढल्या जाणाऱ्या चरख्याचा वापर करतात. पर्यटकांची याला मोठी पसंती असताना दिसत आहे, अशी माहिती बोरकर रसवंतीगृहाचे मालक विजय बोरकर आणि मोनाली बोरकर यांनी सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)