उन्हाळ्यात ‘कलिंगड’ खाण्याचे फायदे, वाचून व्हाल चकित

रखरखीत उन्हाळ्यात लालबुंद आणि थंडगार कलिंगड खाण्याची मजा काही वेगळीच असते. शरीराला थंडावा देणारे कलिंगड तुम्ही उन्हाळ्यात मनसोक्त खाऊ शकता. या दिवसात कलिंगड खाणे खूप आवश्‍यक आहे. जाणून घेवूया, याचे फायदे…

कलिंगड तुमच्या शरीराचे तापमान व रक्तदाब कमी करण्यास मदत करते. यामुळे उन्हाळ्यात याचे जास्तीत-जास्त सेवन करणे गरजेचे आहे. जेणेकरुन, उष्माघातापासून बचाव होईल.

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आढळते. हे किडनीतील अनावश्‍यक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यातील अँटी ऑक्‍सिडंट्‌स किडनीला सुदृढ ठेवण्याचे काम करतात.

कलिंगडातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतो. यामुळे रक्त गोठणे, स्ट्रोक, हार्ट अटॅक यांचा धोका दूर होतो.

कलिंगडातील लायकोपीन, कॅरोटिनॉईड फायटोन्यूट्रिएंट कॅन्सरपासून बचाव करण्याचे काम करतात. लायकोपीनमुळे स्तन, प्रोस्टेट, फुफ्फुस, इत्यादी प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका टळतो.

खाण्यावरील बंधनांमुळे मधुमेहींना सतत उर्जेची कमतरता व थकवा जाणवत असतो. अशावेळी ऊर्जा मिळण्यासाठी कलिंगडचा ज्यूस एक उत्तम पर्याय आहे.

कलिंगडात लायकोपीन व कॅरोटिनॉईड मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे ह्रदयाचे कार्य सुधारते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व ह्रदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

कलिंगडातील पोषण घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वयोमानानुसार येणारे अंधत्व, डोळे कोरडे होणे, ग्लुकोमा अशा अनेक समस्यांसाठी हे गुणकारी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)