उन्हाळ्यातील पेय : प्या आरोग्यदायी, रुचकर सोलकढी  

मुंबई : जसजसा उन्हाळा वाढतोय, तसे शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांची मागणी वाढते. सध्या बाजारात अनेक प्रकारची शीतपेय उपलब्ध आहेत. पण, त्यातील अनेक आरोग्याच्या दृष्टीने घटक असतात.आबालवृद्धांना चालणारी आणि रुचकर शिवाय शरीरास आरोग्यदायी सोलकढी हे उन्हाळ्यातील उत्तम पेय आहे.

साहित्य : ताज्या नारळाचं दूध २ कप
४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
१-२  लसूण पाकळ्या (असेल तर)
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे

कृती : १. १ कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून ही प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दूध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पातळ करून घ्या.
२. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला, म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.
३. नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला. लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार प्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)