उन्हाळ्याच्या तोंडावर जलतरण तलावाची दुरवस्था

प्रशांत साळुंके

चिखली – देखभाल व दुरुस्ती अभावी संभाजीनगर मधील जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छतेचा फार मोठा अभाव दिसून आला आहे. येथील तलावाच्या वॉशरुममधील शॉवरचीही मोडतोड केली गेली असून स्वच्छतागृहामध्ये गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी भिंती रंगल्या आहेत. तसेच येथे साहित्य ठेवण्यासाठी असलेले लॉकरला चाव्याच नसल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना तलावाच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलांना पोहण्याचा आनंद घेता यावा या हेतूने महापालिकेने संभाजीनगर येथे पोहण्याचा तलाव बांधला आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून या तलावाला अवकळा लागली असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या जलतरण तलावामध्ये प्रवेश करताच प्रवेशद्वारामधून आत जातानाच डाव्या आणि उजव्या बाजूला गुटख्याच्या पिचकाऱ्या दिसून येतात. त्यामुळे जलतरण परिसरात दुर्गंधीचा सामना करावा लागतो. बाहेरील मोकळ्या जागेत झुडपे वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, स्वच्छतागृहांमध्येही गुटखा व तंबाखू खावून लोक सर्रास अस्वच्छता पसरवत आहेत. जलतरण तलावातील पाणी वेळच्या वेळी स्वच्छ केले जात नाही. जलतरण परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी तैनात असतात तरीही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

जलतरण तलावामध्ये महिला वर्गाचेही पोहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यासाठी महिला प्रशिक्षकाची गरज आहे. या तलावाच्या आतील वॉशरुमचे नळ तुटलेले आहेत. त्यातून पाण्याची मोठ्‌या प्रमाणावर गळती होते. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, शरीर थंड करण्यासाठी आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मुले नदी, विहीर, कालवा या ठिकाणाचा मार्ग निवडतात. परीक्षा संपल्यानंतर संभाजीनगर जलतरण तलावावर मोठी गर्दी होत असते. महापालिकेला यामाध्यमातून चांगले उत्पन्न मिळते. उन्हाळा हा जलतरण तलावातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी हंगाम समजला जातो. असे असताना महापालिकेच्या क्रीडा विभागाचे तलतरण तलावाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने जलतरण प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)