चिंबळी-खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील व औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी परिसरात उन्हाळी हंगामातील बाजरीच्या पिकाच्या कणसाची मळणीची लगबग सुरू झाली आहे.
या वर्षी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदे, बटाटा आदि पिकांची काढणी करून फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला घेण्यात आलेल्या उन्हाळी हंगामातील बाजरीच्या पिकाला हवामान पोषक ठरल्याने पिक जोमाने आले होते. त्यामुळे चिंबळी, कुरूळी, मोशी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ, गोलेगांव परिसरातील शेतकरी वर्गाने पाणी, खत वेळेवर देऊन खुरपणी केल्याने पिक मोठ्या जोमाने आले. त्यामुळे उत्पन्न भरघोस मिळणार असल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले. या भागांत काही शेतकरी बाजरीच्या पिकाची काढणी करीत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून उन्हाची कडक तीव्रता वाढली असून ढगाळ हवामान येत पावसाचे सावट निर्माण होऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी काढलेल्या बाजरीच्या कणसाची मळणी प्रत्येक शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे मशिनच्या साह्याने करताना दिसत आहेत. कुरूळी, चिंबळी परिसरातील शेतकरी वर्गाने उन्हाळी हंगामातील बाजरीच्या पिकाची पेरणी मोठ्या केली. या परिसरात या पिकाची सध्या काढणी अंतिम टप्पात आली असून, मळणी यंत्राला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी डिझेलचे भाव वाढल्याने बाजरीच्या एका पोत्यासाठी 250 रूपये दर मळणीसाठी घेतले जात असल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)