उन्हाळी प्रशिक्षणांमध्ये जलतरणाला प्राधान्य

पिंपरी – उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या की मुलांना वेध लागतात ते विविध प्रशिक्षण शिबिरांचे, त्यातच पोहणे ही काळाची गरज आहे. पाण्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोहता येणे गरजेचे असते. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत जलतरण प्रशिक्षणाकडे मुलांचा ओढा वाढला आहे. तर मोठ्यांकडून “फिटनेस’साठीही जलतरणाला प्राधान्य दिले जात असल्याचे पहायला मिळत असून यामध्ये महिला वर्गाची संख्या लक्षणीय आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे 12 जलतरण तलाव आहेत. महापालिका त्यांचा निर्धारीत वेळ संपल्यानंतरही सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत जलतरण प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थांना हे तलाव भाडे तत्वाने वापरण्यास देत असते. या वर्षाच्या उन्हाळी हंगामात 12 जलतरण तलावात एकून 18 प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील बहुतेक सर्वच जलतरण तलावातील प्रशिक्षण शिबिरांमध्ये जलतरण शिकण्यासाठी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांची प्रचंड मोठी हजेरी दिसून येत आहे.

पोहणे हा सर्वांगीण व्यायाम प्रकार आहे. यामध्ये शरीराची पुर्ण हालचाल विशिष्ठ पाण्यातील दाबाने नियंत्रीत होत असते. शिवाय ब्रीद करण्याचाही मोठा फायदा आहे. ब्रीद म्हणजे पाण्यात डोके घालून नाकाने श्‍वास सोडणे व डोकेवर काढून तोंडाने श्‍वास घेणे. या पद्धतीमुळे न थकता पाण्यात आपण सरावुासार जास्तीत-जास्त अंतर कापत खुप वेळ पोहु शकतो त्यामुळे फुफ्फुसाचा व्यायाम होवून त्याची प्रसरण-अकुंचन क्षमता वाढते. तसेच दररोज पोहल्याने मानसिक ताण ही कमी होत असून निरोगी आरोग्य लाभते.

महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन व एस. एस. एस. एन्टरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब मगर जलतरण तलावामध्ये या हंगामात 4 प्रशिक्षण बॅचेसचे नियोजन केले आहे. यापैकी प्रथम सत्रातील 2 बॅचेस पुर्ण झाल्या असून यामध्ये नुकतेच 120 विद्यार्थी पोहण्यास शिकून बाहेर पडले आहेत. तर सध्या दुसऱ्या सत्रातील 16 मे ते 16 जून पर्यंत दोन बॅचेस घेतल्या जात आहेत. यामध्ये तयार होणारे प्रशिक्षणार्थी मुले आयुष्यात कधीही पाण्यातील संकटांना घाबरणार नाहीत. तसेच ज्यांना स्विमींग क्षेत्रात करीयर कराचे आहे त्यांना या शिबिराचा मोठा फायदा होत असतो. पोहण्याचे अनेक शारिरीक व मानसिक फायेद सर्वांनाच होत असतात, अशी माहिती राज्यस्तरीय जलतरणपट्टू व प्रशिक्षक सुनील ननवरे यांनी दिली.

योग्य प्रशिक्षकांची निवड करा
शिबीर आयोजित करणारी व्यक्ती अथवा संस्था यांचा या क्षेत्रातील अनुभव पालकांनी तपासावा. संस्था मान्यताप्राप्त आहे का, त्यांचे प्रशिक्षक स्वतः स्विमर किंवा राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय खेळाडू आहेत का या बाबी तपासाव्यात. तसेच केवळ पत्रकबाजी व जाहिरातीमधील माहितीवर विश्‍वास ठेवू नये. संबंधितांची प्रमाणपत्रे, मान्यताप्राप्त संस्थांचे लाईफ गार्ड कोर्सेसची प्रमाणपत्रे तपासावीत. तसेच महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षक आहेत का, या सर्वच बाबींची सखोल तपासणी झाल्यानंतर योग्य शिबीराची निवड करावी, असे आवाहन महापालिकेच्या जलतरण प्रशिक्षकांकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)