उन्हाळी पिकांची घ्यावयाची काळजी (भाग एक)

सुरु ऊसवाढ-  सुरु ऊसाची लागवड होऊन 6 ते 8 आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 100 किलो (227 किलो युरीया) या प्रमाणात द्यावा. 8 ते 10 दिवासाच्या अंतराने गरजे प्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊसाच्या सरीमध्ये हेक्‍टरी 5 टन पाचटाचे आच्छादन टाकावे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल जास्त काळ टिकून राहते व सेंद्रिय खतांचा पुरवठा सुध्दा होतो.

उन्हाळी भुईमूगवाढ – उष्ण व कोरड्या हवामानात उन्हाळी भुईमुग पिकात तुडतुडे व फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा डायमेथोएट 14 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकास पाणी देताना तुषार सिंचनाचाच वापर करावा. शक्‍यतो सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. टरबूज/खरबूज-टरबूज व खरबूज या पिकांवरील फुलकिडे, मावा व पांढरी माशी यांची पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे किटक विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कांदावाढ – कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी कार्बोसल्फान 10 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के हे संयुक्त किटकनाशक 20 मिली प्रति 10 लिटर पाणी अधिक 10 मिली स्टिकर या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे. करपा रोगाचे प्रमाण दिसून आल्यास त्याचे नियंत्रणासाठी मॅकोझेब किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली प्रमाणे वरील किटकनाशकात मिसळून फवारणी करावी. कांदा काढणीपूर्वी 15 दिवस अगोदर पिकावर कार्बेडाझीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

मिरचीवाढ – मिरचीवरील रस शोषणाऱ्या फुलकिडे, पांढरी माशी व कोळी मुळे चुरडा-मुरडा व तसेच फळसड/ डायबॅक (फांद्या वाळणे), पानावरील ठिपके इत्यादी रोग आढळून आल्यास, त्यासाठी फिप्रोनील 5 एस.सी. 15 मिली किंवा फेनपायरॉक्‍झीमेट 5 ईसी 10 मिली किंवा फेनाक्‍झाक्विन 10 ईसी 20 मिली अधिक मॅकोझेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम किंवा डायफोकानॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या हात पंपाने फवारणी करावी. 10 दिवसांच्या अंतराने या फवारण्या आलटून-पालटून कराव्यात.

टोमॅटो वाढ – उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केली असल्यास टोमॅटोच्या दोन ओळीनंतर मका पिकाची लागवड करावी त्यामुळे फुलगळ कमी होण्यास मदत होईल. टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) हा रोग पांढरी माशी मार्फत आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस हा फुलकिड्यामार्फत होत असल्याने या किडीचे वेळीच नियंत्रण होणे गरज असल्याने रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा. पिकामध्ये पिवळे चिकट सापळे वापरावेत. गरुोसार फिप्रोनील 5 एस.सी. 15 मिली किंवा कार्बोसल्फान 25 ईसी. 10 मिली अधिक मॅकोझेब 25 ग्रॅम किंवा कार्बेडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के (संयुक्त किटकाशक) 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी. अधनुा-मधनुा 4 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)