उन्हाळा आणि डोळ्यांची निगा (भाग एक)

  सुजाता गानू

डोळयाभोवती काळी वर्तुळे निर्माण होणे हा प्रकार फक्त वय झाले कीच उदभवतो असे नाही तर तरुण वयातही ही समस्या निर्माण होते. डोळ्याभोवती काळी वर्तुळे जमा होण्याची खूप कारणे आहेत. चिंताग्रस्त होणे, इर्षा करणे, चिडचिडा स्वभाव होणे यामुळे आपले स्वास्थ जाते, झोप लागत नाही, खाण्यापिण्यात रूची वाटत नाही. किंवा व्हिटॅमिन्सचा अभाव.याचा परिणाम पचनक्रियेवर होऊन अंगात उष्णता वाढते. शरीरातील “बी’ आणि “सी’ विटॅमिन कमी होते. यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. त्यासाठी हे उपाय करून पहा.

आठवड्यातून एक- दोन वेळा चेहऱ्याला वाफ द्यावी. डोळ्यांना थकवा आल्यास थोडा वेळ डोळे मिटून शांत पडून रहावे. थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. कडक उन्हामध्ये जायचे असल्यास गॉगल वापरावा. झोपण्यापूर्वी क्‍लिनझिंग मिल्कने चेहरा पुसून मेकअप काढावा.धूम्रपान, मदिरापान या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.चष्मा लागला असेल तर चष्मा वापरलाच पाहिजे. शरीरातील ए, बी, व सी विटॅमिन कमी झाली असतील तर डॉक्‍टरांकडून औषधोपचार घ्यावेत.डोळ्याभोवती काळी वर्तुळे अतिशय वाढली असली तर रक्त तपासून रक्तामध्ये कोणते घटक कमी आहेत. त्याप्रमाणे औषधोपचार करून घ्यावा.पोटामध्ये कृमी व जंत झाले असतील तर पचनक्रिया बिघडून तब्बेत खराब होते व काळी वर्तुळे वाढतात. त्यामुळे जंताचे औषध घ्यावे.लिंबूचा रस, एरंडेल किंवा जैतून तेल समप्रमाणात मिसळून चेहऱ्याला हळुवार मालिश करावी. एक तासानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. अशी काळजी घेतली तर डोळयाखाली काळी वर्तुळे ही समस्या उदभवणारच नाही.

अशी राखावी निगा…

नयन तुझे जादूगार असे म्हणणाऱ्या प्रियकराला प्रेयसीचे डोळे सुंदर वाटावे म्हणून डोळयाची निगा ठेवणे अतिशय आवश्‍यक आहे. डोळे हा आपल्या शरीराचा महत्वाचा घटक आहे. तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष नको.अधून मधून डोळयावर हात ठेवून डोळयाला आराम द्यावा.गुलाबजलामधे कापूस बुडवून त्याच्या पट्‌टया डोळयावर ठेवाव्यात.डोळयाभोवतीच्या त्वचेस मध व काकडीचा रस लावावा. शुध्द मध डोळयातही घालतात ज्याने डोळे स्वच्छ होतात.

दिवसभरात 15 मिनिटे तरी डोळे मिटून स्वस्थ पडावे.पपई, गाजर,दूध, सोयाबीन, लाल भोपळा, चीज इ. पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.त्रिफळा चुर्णाने डोळे धुतल्यास डोळे तजेलदार होतात.कडूलिंब रसांजन आणि हिरडा यांच्या मिश्रणाचा लेप डोळयावर द्यावा म्हणजे काळी वर्तुळं जातात. झोपून, उन्हात, चालत्या गाडीत आजीबात वाचू नये.दिवसभरात दोनदा तरी डोळयावर गार पाण्याचा हबका मारावा डोळे वर खाली, दोन्ही बाजूस 10 वेळा फिरवावेत.पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राकडे एकटक पहावे. दृष्टि सुधारते.टी.व्ही. एकटक पाहू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)