उन्हाच्या तीव्रतेने मोहोर झडला

सोमेश्‍वरनगर- बारामती तालुक्‍यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे जीवन हे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. यावर्षी बळीराजाला गहू पिकाच्या उत्पादनांमध्ये जवळपास 50 टक्के घट झाल्याने तो कोलमडला आहे. तर आंब्याच्या माध्यमातून घटलेले उत्पादन भरून निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. यंदा तालुक्‍यातील आमराईच्या बागांमध्ये मोहोर लगडला होता. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे मोहोर काळा पडल्यामुळे कलमांना फळे येण्याअगोदरच मोहोर झडू लागला आहे, त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत आला आहे.

बारामती तालुका हा आमराई तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्‍यामध्ये सर्वाधिक आंबे येतात; परंतु या हवामानामुळे तालुक्‍यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गहू पिकाच्या वेळी पावसाचे चक्र बिघडले होते, त्यामुळे शेतकरी वर्गाला गहू पिकामध्ये मोठा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले तर आता आंब्याने कंबरडे मोडले असल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)