उन्हाच्या झळा सुरू; पण, काही ठिकाणी पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र

पुणे : एकीकडे उन्हाळ्यामुळे तापमान वाढले आहे. तर आता हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.  दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली आहे.

२४ मार्च रोजी शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ मार्च रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. २६ मार्च रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ मार्च रोजी गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा येथे ३९, तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १२.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)