उन्हाचा चटका अजून दोन दिवस

पुणे,- राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, शुक्रवारपासून (ता. 25) कोकणात हलक्‍या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, जळगाव येथे उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात पारा 45 अंशांच्या पुढे सरकला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव येथे सरासरी तापमानात पाच अंशांची वाढ झाल्याने लाटेची स्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारपर्यंत (ता.27 ) अनेक ठिकाणी तापमान 42 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्‍यता आहे.

मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलके ढग गोळा झाले होते. शुक्रवारपासून कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्‍यता असून, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)