उन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला

मुंबई: दादरमधील कोहिनूर स्क्वेअर हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी यांच्या हातून निसटला आहे. 900 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याने उन्मेश जोशी यांनी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प गमावला आहे. दादरमधील एका आर्किटेक कंपनीने कोहिनूर स्क्वेअरचे काम हाती घेतले असून येत्या 15 ते 18 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उन्मेश जोशी यांनी प्रभादेवी येथील शिवसेना भवनासमोर कोहिनूर स्क्वेअर हा प्रकल्प सुरु केला. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे कामकाज बंद होते. उन्मेश जोशी यांनी 900 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे संबंधित बॅंकांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनलकडे दाद मागितली. ट्रिबुनलने याप्रकरणी निकाल दिल्यानंतर जोशी यांना हा प्रकल्प सोडावा लागला आहे. हा प्रकल्प आता संदीप शिक्रे आणि असोसिएट्‌स या आर्किटेक कंपनीला मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)